पोस्ट्स

  मायबोली ज्यांची मातृभाषा ("मदरटंग") मराठी आहे अशी मुलं जेव्हा "गॅदरींगसाठी डान्स बसवायचाय", "डिबेट कॉंपिटिशन साठी नाव रजिस्टर करायचंय", असं सांगतात तेव्हा मन खूप उदास होतं. स्नेहसंमेलनासाठी न्रुत्य... ठीक आहे 'नाच' सोपं; वक्त्रुत्व स्पर्धेसाठी नावनोंदणी असे मराठी शब्द वापरायला काय होतं ? बोलता बोलता मित्राला 'मिस' का करायचं आणि संवाद साधण्यासाठी 'चॅटिंग'चाच आधार का घ्यायचा? मराठीचा मायबोली म्हणून उल्लेख करतानाच तिला इंग्रजीचा टेकू लावायचा हे खुपणारं आहे.  खरं म्हणजे रोजच्या जीवनात बोलताना वापरण्याजोगे कितीतरी मराठी शब्द उपलब्ध आहेत, असतीलही आणि इच्छा असेल तर शोधून वापरतादेखील येतील. पण या जगाच्या वेगवान स्पर्धेत 'शोध अभियांत्रिकी'तून (सर्च इंजिन) जे शब्दजंजाळ उपलब्ध आहे त्यात बिचाय्रा मराठी शब्दांना स्थान कितीसं ? पाच एक वर्षांपूर्वी पुण्यात भरलेल्या दहाव्या साहित्यिक कलावंत संमेलनात 'मराठी भाषा - स्थिती आणि गती' या विषयावर झालेला परिसंवाद आठवतो. त्यातल्या एक वक्त्या होत्या विद्यावाचस्पती (डॉ.)अश्विनी धोंगडे. त्यां